पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/149

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण १७ वें -xx-- । | शिरच्छेदाची आज्ञा ३५ कॉन्स्टॅटिनोपलमध्ये जानेवारी १९२० सालांत तुर्की पार्लमेंटची बैठक भरली. पार्लमेंटचे कार्य सुरू झाले; पण त्या कार्यात वारंवार अडथळे निर्माण होऊ लागले. कमालपाशांनी जे भविष्य केले होते त्याची प्रचीती, हळूहळू पार्लमेंटच्या सभासदांना येऊ लागली, तुर्की राष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून तुर्की राष्ट्राचे हक्क अबाधित राखण्याकरितां ते त्या ठिकाणी जमले होते. तुर्की राष्ट्राची सूत्रे इंग्रजांच्या व त्यांच्या तंत्राने चालणान्या सुलतानांच्या हाती जावी अशा प्रयत्नांना त्यांनी सक्त विरोध केला; एवढेच नव्हे तर, काँग्रेसने तयार केलेला ' राष्ट्रीय करार' पार्लमेंटमध्ये मंजूर करून घेतला. तो करार म्हणजे विजयी शत्रूना किंवा इंग्रजांना एकप्रकारचे आव्हानच होते.