पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/148

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

झी कमालपाशा पहाण्याकरितां व राष्ट्रावर नियंत्रण ठेवण्याकरितां काँग्रेसचे अस्तित्व अत्यंत जरूरीचे आहे. केवळ निवडणुक लढविण्यापुरतेच काँग्रेसचे कार्य आहे असे समजणे अत्यंत चुकचे आहे. त्याचप्रमाणे पार्लमेंटच्या सभासदांनीं कॉन्स्टॉटनापेल येथे न जातां, अंगोरा येथे पार्लमेंटची बैठक भरविण्यास सुलतांनास भाग पाडावे. कॉन्स्टॅटिनोपलमध्ये इंग्रजांचे वर्चस्व असल्यामुळे पार्लमेंटेच्या सभासदांना स्वातंत्र्य राहाणार नाहीं व त्यांना केव्हां अटक होईल हे सांगता येत नाहीं. तेव्हां या दोन्हीं सूचना पार्लमेंटच्या सभासदांनी परत घ्याव्या, असे कभालपाशांनी सुचविले, पण, त्या प्रतिनिधींनी कमालपाशांचे म्हणणे ऐकले नाही. सर्वांनीं कॉन्स्टाँटनोपल येथे भरविण्यांत येणाच्या पार्लमेंटच्या बैठकीस हजर राहावे असे एकमताने ठरविले. कमालपाशा हे झरझरम प्रांतामधून पार्लमेंटचे सभासद म्हणून निवडून आले होते. त्यांनी कॉन्स्टॉटनोपल येथे भरणाच्या पार्लमेंटच्या बैठकीस हजर राहण्याचे नाकारले. पार्लमेंटचे सर्व सभासद कॉस्टॅटिनोपल येथे जाण्यास निघाले तरी त्या गोष्टीचा आपल्या मनावर काडीमात्र परिणाम होऊ न देता, कमालपाशांनी हत्यारेंपात्यारे व दारूगोळा जमा करण्याचा व सैनिकांना तयार करण्याचा अविश्रांत उद्योग चालू ठेवला. Asan* , * .... १३८ ।