पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/147

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तुर्की काँग्रेस माझ्या छातीवर नाचविण्याकरितां राजद्रोही बदमाशांनी तात्पुरते निर्माण केलेले सरकार आपोआप रद्द होईल आणि तो अनातोलियामधील क्रूर लांडगा कमालपाशा, अनातोलीयाच्या ओसाड प्रदेशांत एकटाच भटकत फिरेल. उद्यां त्याला कोणी विचारणार नाहीं; परवां लोकांच्या स्मृतीपटलावरून तो कायमचा निघून जाईल! हे राष्ट्रांचे कैवारी, हे पार्लमेंटचे नवे सभासद, हीं राजद्रोहीं कुत्रीं या कॉन्टॅटिनोपलमध्ये माझ्या नजरेखाली व इंग्रजांच्या आरमारी तोफांच्या टप्प्यांत एकत्र येतील, आणि-आणि मग मी आहे व ते आहेत, सुलतानांनी संतापाने हाताची बोटे जवळच्या मऊ उशीवर रोविलीं. पार्लमेंटच्या नव्या निवडणुकीत सर्व भागांतून प्रचंड बहुमताने काँग्रेसचे प्रतिनिधी निवडून आले. निवडणूक झाल्यानंतर काँग्रेसने आपली मुख्य कचेरी अंगोरा येथे नेली. या कचेरीत निवडणून आलेले सर्व प्रतिनिधी पुढील वाटाघाटी करण्याकरितां । व कार्याची दिशा ठरविण्याकारतां जमले. काँग्रेस बरखास्त करावी ब पार्लमेंटची बैठक पूर्वीप्रमाणेच कॉन्स्टॅटिनोपल येथे भरवावी असे क्याच प्रतिनिधींचे मत पडले. कमालपाशांनी या दोन्ही गोष्टींस जबरदस्त विरोध केला, १६ प्रतिनिधी कार्य कसे करता है। १३