पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/146

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गाली कमालपाशा त्यांनीं तारखात्याचा कबजा घेऊन राजधानाचा इतर प्रांतांशी असलेला संबंध तोडून टाकण्याविषयीं लष्करी अधिका-यांना कळविले. त्याप्रमाणे सर्व जमीनमहसूल आपल्याकडे पाहोंचता करण्याबद्दल व शक्य त्याठिकाणी आपल्या विश्वासांतील मुलकी अधिकारी नेमण्याबद्दल हुकूम दिला. हे ऐकून सुलतानांचे धाबे दणाणले. काय करावे हे त्यांना सुचेना. युद्धतहकुबच्या अनुसार फौज ठेवण्याची मनाई असल्यामुळे कमालपाशांनी घोषित केलेल्या बंडाचे पारिपत्य करण्यास सुलतान असमर्थ होते. शिवाय जे कांहीं लष्करी अधिकारी होते ते सर्व कमालपाशांच्या निशाणाखाली जमल्यामुळे व सर्व जनता त्यांच्याच मागे असल्यामुळे हात चोळीत बसण्यापलीकडे सुलतान कांहींही करू शकत नव्हते. शेवटी काँग्रेसने कळविल्याप्रमाणे सुलतानांनी जुने पार्लमेंट बरखास्त केले व नव्या निवडणुकी करणेस त्यांनी संमत्ती दिली. पण ही संमत्ती देतांना सुलतान मिस्किलपणे हसले; त्या हसण्यांत फार मोठा अर्थ दडला होता.

    • नव्या निवडणुका होऊन त्यांत नॅशनल असेंब्लीचे संव अराजक सभासद निवडून येतील; या निवडणुकी झाल्या म्हणजे

११८