पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/145

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तुर्की काँग्रेस राष्ट्रीय करार हा आजच्या परिस्थितीत किती अवश्य व अपरिहार्य आहे याचे कमालीशांनी इतके वक्तृत्वपूर्ण समर्थन केले की, त्यांचे भाषण संपतांच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. सर्व वातावरण उत्साहाने भरून गेले. • स्वातंत्र्य किंवा मृत्यू ! ' अशा एकच गर्जना झाली आणि राष्ट्रीय करार एकमताने मंजूर करण्यात आला.या करारामधील अटी इंग्रजांनी व त्यांच्या अकीत असणा-या सुलतानांनी मान्य करांपर्यंत स्वातंत्र्याचा लढा चालवावयाचा असे निश्चित झाले.

  • कमालपाशा चिरायू होवोत ! " दुसरी गर्जना झाली. | ६ नाहीं, राष्ट्र चिरायू होवो ! " सद्गदीत होऊन कमालपाशा म्हणाले.

त्याच बैठकीत काँग्रेसने तुर्कस्थानाचे स्वतंत्र व तात्पुरते सरकार स्थापित केल्याचे घोषीत केले. हा राज्यकारभार व्यवास्थत चालविण्याकारतां एक कार्यकारी मंडळ निवडण्यांत येऊन, कमालपाशांना या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष करण्यांत आले. । | जुने तुकी पार्लमेंट बरखास्त करून नव्या निवडणूकी करण्यात याव्या असे राष्ट्रीय कार्यकारी मंडळाकडून मध्यवर्ती सरकारास कळविण्यात आले. मध्यवर्ती सरकारकडून उत्तर न आल्यामुळे कमालपाशांनी सर्व नियंत्रण आपल्या हाती घेतले. १२१