पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/142

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गाझी कमालपाशा तेथील लोकांशी समरस झाले पाहिजे, त्यांच्या भावना चेतविल्या पाहिजेत. आपण माझ्यावर विश्वास प्रगट केला याबद्दल मी आपला आभारी आहे; पण मी बंडखोर आहे, असे सरकारने जाहीर केले आहे. मी जर पकडला गेलो तर माझा शेवट कसा होणार याची मला पूर्ण जाणीव आहे. जे माझ्याशी सहकार्य करू इच्छितात त्यांचाही शेवट माझ्याप्रमाणेच होणार, हे त्यांनी लक्षात ठेवावे. माझ्याशी सहकार्य करू इच्छिणा-यांनीं, वाटेल ते दिव्य करावे लागले तरी राष्ट्राचे पवित्र कार्य कदापिही सोडणार नाही अशी प्रतिज्ञा केली पाहिजे कमालपाशांच्या या प्रभावी भाषणाने प्रतिनिधींच्या अंतःकरणाचा कबजा घेतला. कमालपाशा खाली बसतांच टाळ्यांचा कडकडाट झाला.

  • तुमच्या सारखा पुढारी आम्हांला पाहिजे, नव्हे तुम्हींच आमचे पुढारी बनले पाहिजे, एक मुख्य प्रतिनिधी उद्गारला व बाकीच्या सर्वांनी त्याला संमती दिली.

| आज मी सर्व साधारण नागरिक आहे. सैन्यामधून मला बडतर्फ करण्यांत आले आहे पण, मुख्य सैन्याधिकारी म्हणून पूर्वी जशा माझ्या आज्ञा मान्य करण्यात येत होत्या तशा यापुढेही करण्यांत आल्या पाहिजेत ? ११४