पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/141

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तुक कॅाग्रस शेवटच्या नागरिकाची सहानुभूती व आधार मिळेपर्यंत आपण विश्रांती घेतां उपयोगी नाहीं अरीफ निरुत्तर झाला; कमालपाशांनी पुनः वादविवादाकडे आपले लक्ष वळविले. यावेळी एक राजकीय पक्ष स्थापन करून आपल्या हक्कांची मागणी करावी हे आजच्या परिस्थितीत शक्य व योग्य दिसते असे अट्टाहासाने कांहीं वृद्ध प्रतिनिधी प्रतिपादन करीत होते. कमालपाशा उभे राहिले व म्हणाले, “ सभ्य गृहस्थहो, आपण राजकीय पक्ष स्थापन करण्याकरितां किंवा निष्फळ चर्चा करण्याकरितां जमलो नाही. आपणाला आपल्या राष्ट्राचे स्वातंत्र्य व सत्व राखावयाचे आहे. आपल्या शिरावर फार मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. आपण एकाद्या पक्षाचे किंवा समितीचे सभासद नसून अखिल राष्ट्राचे प्रतिनिधी आहत. आपल्या राष्ट्रातील लोकांच्या स्वास्थाकरितां झगडणे, लढणे, हे आपलें पवित्र कार्य आहे. अर्धवट मनोवृत्तीच्या किंवा दोलाचल वृत्तीच्या लोकांना आमच्यामध्ये स्थान नाही.आपल्यापुढे जे महत्वाचे कार्य आहे तें गुप्तपणाने कधीही सिद्धीस जाणार नाही किंवा बहुमताच्या आणि वादविवादाच्या जोरावर शत्रूच्या हातून आपले हक हिसकून घेता येणार नाहींत. आपण जनतेमध्ये जागृती निर्माण केली पाहिजे. स्वातंत्र्याचा संदेश खेडोपाडी पोहचावला पाहिजे, १२३