पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/143

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तुर्की काँग्रेस

  • सर्व सैन्य आपल्या मागे आहे, ” एक सैन्याधिकारी

म्हणाश.

  • आणि जनताही,' प्रतिनिधी म्हणाले.

अधिवेशनाचे कार्य पुन्हां उत्साहाने सुरू झाले. अधिवेशन ऐन रंगांत आले असतां काँग्रेसच्या प्रतिनिधींना एकदम कैद करावे असा हुकूम सुलतानांनी त्या प्रांतांचे गव्हर्नर अली गालीब यांना पाठवून दिला. अली गालीब हे अत्यंत राजानिष्ठ गव्हर्नर समजले जात होते. तो प्रांत अडाणी, खेडवळ व अत्यंत राजनिष्ठ अशा कुर्द टाळ्यांचा होता. त्या टोळ्यांच्या सहाय्याने सिवास येथे काँग्रेसवर छापा घालावयाचे अली गालीब यांनी ठरविले. काँग्रेसच्या प्रतिनिधींना ही बातमी लागतांच, त्यांना फार संताप आला. कुर्दीसारख्या अडाणी लोकांकडून, राष्ट्राचे प्रतिनिधी म्हणविणा-या धुरीणांची मानखंडणा व्हावयाची वेळ यावी, या गोष्टीचा त्यांना फार विषाद वाटला, कमालपाशांनी या कुर्द लोकांचा व गव्हर्नरचा ताबडतोब बंदोबस्त करावा असे सर्व प्रतिनिधीनी सुचविले. प्रतिनिधींच्या इच्छेनुसार कमालपाशांनी अत्यंत इमानी व तडफदार तरुणांचे सैन्य ताबडतोब उभारून त्या सैन्यास कुर्द लोकांचे पारिपत्य करण्याकरितां पाठविले. कमालपाशांच्या १३९