पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/140

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गाझा कमालपाशी अशक्य आहे,' कांहींनी अमेरिकेचे सहाय्य घ्यावे,' तर काहींनी * सरकार नि प्रजा यांच्या लढ्यामुळे राष्ट्रांत यादवी माजेल; या करितां सनदशीर मार्गांनी हा प्रश्न सोडवावा,' अशी आपआपली मते जोरजोराने मांडली. हे मतभेद मिटविण्याची कमालपाशांनी शिकस्त केली. त्यांनी प्रतिनिधींबरोबर तासचेतास वादविवाद केला. वादविवादाचा शेवट होत नाही असे वाटून, अरीफ नांवाचा एक बडा लष्करी अधिकारी कमालपाशांना हळुच ह्मणाला, ' ही काँग्रेस आणि हे लोकांचे प्रतिनिधी यांना जाऊं दे मसणांत ! तुह्मीं यांच्या नादाला लागू नका. आमचे सर्व लष्कर तुमच्यामागे आहे. आणि तुम्हांला सर्वाधिकारी समजून तुमच्या आज्ञा मान्य करण्याचे आम्ही एकमताने ठरविले आहे. आम्हांला आज्ञा द्या ह्मणजे पहातो तुम्हांला हे प्रतिनिधी कसा विरोध करतात ते." कमालपाशा शांतपणे म्हणाले, ८८ अरीफ, तुझे म्हणणे आले माझ्या लक्ष्यांत ! पण, नुसत्या संगीनींच्या जोरावर हा अवघड प्रश्न सोडविला जाणार नाही. जनतेमध्ये जागृति, आत्मविश्वास व निष्ठा उत्पन्न केली पाहिजे. आपण आंधळ्याला डोळस केले पाहिजे; आणि त्याकरितां राष्ट्राच्या कानाकोप-यांतून प्रचारक म्हणून संचार केला पाहिजे. आपल्या राष्ट्राच्या पवित्र कार्याकरितां १२२