पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/139

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तुर्क काँग्रेस स्थापना करणे, असा ठराव एकमतानें पास झाला. सिवास येथे भरणाच्या काँग्रेसपुढे वलि ठराव मांडण्याकरितां एक कार्यकारी मंडळ निवडण्यात आले व कमालपाशांना त्या मंडळाचे चेअरमन करण्यांत आले.त्याचवेळी काँग्रेसला हजर राहण्याचा कमालपाशांना हक्क असावा म्हणून इरझरमतर्फे प्रतिनिधी ह्मणून त्यांची निवड झाली. ठरल्याप्रमाणे काँग्रेस भरली. तुर्कस्थानाच्या सर्व प्रांतांतून जनतेचे प्रतिनिधी आले होते. काँग्रेस ही अराजकांची मजलीस आहे असा सर्वत्र पुकारा झाल्यामुळे काँग्रेसला जे अँतिनिधी आले होत तेजीवावर उदार होऊनच आले होते.काँग्रेसला जातांना सरकारकडून अडथळा किंवा अटक होऊ नये म्हणून कोणी गुप्तपणाने, कोणी वेषांतराने, कुणी आडमार्गाने, तर कोणा डोंगरकपारीच्या रस्त्याने, ते काँग्रेसच्या अधिवेशनास हजर झाले होते. कमालपाशांना पकडण्याकरितां सरकारने कडेकोट बंदोबस्त केला होता. कमालपाशांना ही बातमी लागल्याबरोबर रात्रीच्या वेळी डोंगर -पर्वतामधून मोठ्या मुष्कलीने ते सिवास येथे जाऊन पोहोंचले. काँग्रेसचे अधिवेशन सुरू झाले. प्रतिनिधींमध्ये कडाक्याचा वादविवाद सुरू झाला. कांहीं प्रतिनिधींनी • स्वातंत्र्याकरितां सशस्त्र लढा सुरू करावा,' कांहींनी * सशस्त्र लढा आजच्या परिस्थितीत १११