पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/138

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गाझी कमालपाशा स्वातंत्र्याकरितां चाललेला लढा,या सर्वांचा नायनाट कमालपाशांच्या बंदीवासाने किंवा मृत्युने होणार होता !: कमालपाशांनी नवजवान तुकच्या अंतःकरणांत पेटवलेली स्वातंत्र्य ज्योत विझणार होती, त्यांनी राष्ट्रांत उत्पन्न केलेले नवचैतन्य मृतप्राय ठरणार होते, त्यांनी समतेची केलेली पुकार हवेत विरून जाणारी होती, त्यांनी राष्ट्राकरितां सुरू केलेला आत्मयज्ञ स्थगित होणार होता, आपल्या राष्ट्राला अव्वल दर्जाचे स्थान प्राप्त करून देण्याची त्यांची महत्वाकांक्षा धुळीस मिळणार होती. कझामकारांच्या अंतःकरणांत या विचारांनी कालवाकालव सुरू झाली, तुर्कस्थानाचे भेसूर स्वरूप त्यांना भेडसावू लागले, राष्ट्राचे भीषण भवितव्य त्यांच्या अंतःकरणाचा ठाव घेऊ लागले. --- कझीमकारा बेकर यांचा चेहरा बदलला, त्यांच्या डोळ्यांत निश्चयाचे तेज तळपू लागले. ते ताडकन् उठले व समोर बसलेल्या कमालपाशांच्या गळ्याला त्यांनी मिठी मारली * कमाल, माझ्या शरिरांत रक्ताचा एक थेंब शिल्लक असेपर्यंत मी तुमचा व तुमच्या स्वातंत्र्यप्रेमी स्नेह्यांचा सांभाळ करीन. | परिषदेचे कार्य पुढे सुरू होऊन परकीय शत्रूंचा प्रतिकार करणे, आणि राज्यकारभार चालविण्याकरितां तात्पुरत्या सरकाराची