पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/137

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तुर्की काँग्रेस मार्शल बेकार गोंधळून गेले. काय करावे हे त्यांना कळेना. * मला थोडा वेळ विचार करू द्या " असे म्हणत ते खोलीच्या बाहेर पडले. ते व्हरांड्यात एकटेच येरझाया घालीत होते. त्यांच्या चेहयावर धर्मबिंदू चमकू लागले. त्यांचा वसा सुकून आला. कझीमकारा बेकार हे बडे लष्करी अधिकारी होते व सुलतानांचा त्यांच्यावर फार विश्वास होता. हुकूमाची अपलबजावणी कशी करावी हे त्यांना कांहीं सुचेना.त्यांनी कमालपांशाना खांद्यास खांदा देऊन लढण्याचे वचन दिले होते; पण कमालपाशांना कैद करावे अशी त्यांची राजानष्ठा त्यांना सांगू लागली. आपले वचन पाळावे की सुलतानांचा हुकूम मान्य करावा, याबद्दल त्यांच्या डोक्यांत काहूर माजले कमालपाशांचे व त्याबरोबर राष्ट्राचे भावतव्य, कझामकारा बेकर यांच्या हाती होते. कमालपाशांना कैद केले तर कमालपाशांच्या सर्व आकांक्षा धुळीस मिळून त्यांना जन्मभर माल्टामध्ये इंग्रजांचे कैदी होऊन राहणे किंवा सुलतानांच्या रोषास बळी पडून या जगांतून कायमचे नाहीसे होणे भाग होते. कुमालपाशांचा तुरुंगवास म्हणजे राष्ट्राचा बंदास; कमालपाशांचा मृत्यु म्हणजे राष्ट्राचा नि:पात होता! आजपर्यंत झालेली जागृती, राष्ट्राच्या १११