पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/134

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गाझी कमालपाशा पत्करणार नाहीं.लढाई हे आयुष्यामधील श्रेष्ठ तत्व आहे असे आह्मीं समजतो. आम्हीं जा किंवा मरूं; पण अपमानाचें जीवित कंठणार नाही. आमच्या सामर्थ्यावर आमचा अढळ विश्वास आहे. त्या सामर्थ्याच्या जोरावर आम्ही आपले ध्येय साध्य करूं. आपल्यापुढे दोनच प्रश्न आहेत. एक स्वातंत्र्य किंवा मृत्यू ! ” कमालपाशांच्या भाषणाने सर्वांची अंतःकरणे भारून गेली. त्यापैकी एक म्हणाला, '५ या दुर्धर कालांत अल्लाने आपला दूत आमच्याकडे पाठवून दिला आहे." दुसरा म्हणाला • अल्ला,कमालपाशांस उदंड आयुष्य देवो.” यानंतर वादविवादास सुरवात झाली. हे सर्व कबूल; पण या स्वातंत्र्य-चळवळीचे धुरीणत्व कोण स्वीकारणार ? " एक वृद्ध म्हणाला. । ६ अर्थात् कमालपाशा " बरेचजण ओरडले. ८६ धुरीणत्व किंवा पुढारीपणा एकाच्या हाती न देता तो मंडळाच्या हाती असावा.आठ दहा लोकांचे एक मंडळ बनवावे." कमाल म्हणाले, “ सद्गृहस्थहो, अत्यंत मोठे व जाखमीचे कार्य असेल तर त्याचा पुढाकार योग्य, उत्साही व निश्चयी अशा एका व्यक्तिकडेच दिला पाहिजे, असे इतिहास निःशकपणे आपणांस ११६