पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/135

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तुकी काँग्रेस सांगत आहे. अशा त-हेचे कार्य मंडळाकडून किंवा चारचौघांकडून कधीच पार पडत नाही; उलट कार्यामध्ये मतभेद किंवा अडथळेच निर्माण होतात. माझ्या एकट्याकडेच पुढारीपणाचा मक्ता यावा असा मात्र याचा अर्थ कोणी करू नये. आपणाला योग्य वाटेल तो पुढारी निवडा. आपण ज्याला निवडाल त्याच्या आज्ञेत आम्ही सर्व राहूं. ६६ कमालपाशांखेरीज पुढारी होण्यास कोणी योग्य दिसत नाहीं " बरेच जण ओरडले,

  • भिडस्तपणामुळे खरं मत काय आहे ते कळत नाहीं. याकरितां गुप्तपणाने मते घ्यावीं में अधिक श्रेयस्कर आहे,' एकजण शिष्टपणे म्हणाले,

शेवटी गुप्तपणे मते घेण्यांत येऊन ती त्या ठिकाणी जमलेल्या प्रतिनिधीमध्ये अत्यंत वृद्ध अशा एका गृहस्थाकडून मोजण्यांत आली. नंतर त्या वृद्ध गृहस्थांनी उठून सांगितले, “ कमालपाशा यांच्याकडे एकमताने पुढारीपण देण्यात आले आहे." सगळीकडे टाळ्यांचा कडकडाट झाला. नंतर एकदम नितांत शांतता पसरली. सभेमध्ये एक जासूद आला व त्याने मार्शल कझीमकारा बेकीर यांच्या हातीं एक लखोटा दिला. ११७