पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/133

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तुर्की काँग्रेस शहरांतील अधिका-यांनी त्यांचा संदेश अमलात आणण्याचे नाकारले. कमालपाशांना काहीतरी अधिकार द्यावा व सिवास येथे भरणाच्या काँग्रेसपुढे ठेवण्यात येणारा नक्की कार्यक्रम आंखावा या दृष्टीने इरझरम येथे निवडक लष्करी पुढारी व प्रतिनिधी यांची परिषद भरविण्यात आली. कमालपाशांचे स्नेही व त्या प्रांतांतले मुख्य लष्करी अधिकारी कझीमकारा बेकर यांच्या सहाय्यानेच ही परिषद बोलाविण्यात आली. परिषदेसमोर भाषण करावयास कमालपाशा उभे राहतांच, सगळीकडे शांतता पसरली. ते खणखणीत आवाजांत ह्मणाले, ६८ अनातोलीयांत आपण राजकीय क्रांति केली पाहिजे. राष्ट्राचे संपूर्ण स्वातंत्र हे आपले ध्येय आहे.जे राष्ट्र आपला मान व अस्तित्व राखण्याची शिकस्त करते, त्या राष्ट्रास जगांतलि कोणतीही शक्ति दडपू शकत नाही. आमच्या पावत्र मातृभूमीतील एक रेसभर देखील जागा आम्हीं परकीयांस द्यावयास तयार नाहीं. आमची मातृभूमी, आमचे राष्ट्र, अभेद्य आहे व राहिले पाहिजे. जें राष्ट्र आपण होऊन दुस-यासमोर नमते, ते गुलाम होण्याच्याच. योग्यतेचे आहे. तुकीच्या नसनसांमध्ये अस्सल रक्त वहात आहे नि त्या रक्ताचा आम्हांला जाज्वल्य अभिमान आहे. अशा अस्सल रक्ताच्या लोकांचे राष्ट्र आपल्या सत्व रक्षणार्थ सदैव लढत राहील; पण गुलामगिरी ११५