पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/132

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण १६ में –XX-- तुर्की काँग्रेस - - - तुर्की जनतेच्या प्रतिनिधींची काँग्रेस बोलावण्याचे अगोदरच ठरले होते हैं आपण मागे वाचलेच आहे. त्या काँग्रेसच्या अधिवेशनाची आमंत्रणे सर्वांना पाठविण्यात आली. प्रत्येक जिल्ह्यास कमालपाशांनी पुढील संदेश घाठविला, आपले राष्ट्र अत्यंत धोक्यात आहे. सध्यांचे सरकार राज्यकारभार करण्यास अत्यंत नालायख बनले आहे. आपल्या राष्ट्राचे स्वातंत्र्य हे जनतेच्या इच्छेवर व उत्साहावर अवलंबून आहे. त्या स्वातंत्र्याचा विचार करण्याकरितां सिवास येथे तुर्की काँग्रेस भरविणेचे ठरविले आहे. प्रत्येक जिल्ह्याने तीन प्रतिनिधी पाठवून द्यावे. हा सर्व व्यवहार अत्यंत गुप्तपणे करण्यात यावा. सुलतानांनी कमालपाशांना हुद्यावरून काढून टाकल्यामुळे, त्यांना कुठलाही अधिकारी दर्जा राहिला नव्हता. त्यामुळे पुष्कळ