पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/131

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

एकमेव पुढारी अधिका-यांना कळविले. कमालपाशांनी आपल्या पुरस्कर्त्यांना व मान देणाच्या लष्करी अधिका-यांना एकत्र बोलावून सांगितले, 4 सुलतान आपल्या विरुद्ध आहेत. आता आपणांस त्यांच्याकडून स्वातंत्र्याकरितां कांहींच मदत मिळणे शक्य नाहीं. आपणाला मोठमोठ्या संकटांना तोंड द्यावे लागेल, अनेक क्लेश भोगावे लागतील, अनेक त्याग करावे लागतील. एकदां में कार्य हाती घेतल्यावर कुणीही माघार घेतां कामा नये किंवा पश्चाताप करता कामा नये. तुम्ही आपला पुढारी म्हणून कोणतरी निवडलाच पाहिजे. तुम्हाला विजय पाहिजे असेल तर एक गोष्ट लक्ष्यांत ठेविली पाहिजे आणि ती म्हणजे तुम्ही सर्वानी एकाचेच नेतृत्व स्वीकारले पाहिजे. एकानेच या चळवळीचा पुढाकार घेतला पाहिजे. तुम्ही मलाच पुढारी व नेता म्हणून निवडलेत तर माझ्या नशिबी जे येईल ते तुम्ही माझ्याबरोबर भोगले पाहिजे. आता मी लष्करी अधिकारी राहिली नाही. यापुढे बंडखोर म्हणून माझा उल्लेख करण्यांत येईल. मी लष्करी अधिकारी होतो त्यावेळी जशा माझ्या आज्ञा तुम्ही पाळीत होता, तशाच यापुढेही पाळत राहाल तर मी आपला पुढारी होऊ शकेन. आपण या गोष्टींची पूर्ण विचार करा आणि मला उत्तर द्या " सर्वांनी कमालपाशांची आज्ञा शिरसावंद्य मानण्याचे कबूल केले आणि एकमताने कमालपाशांना एकमेव पुढारी म्हणून अमत्ती दिली ! ११३