पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/130

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गाझी कमालपाशा होते. कमालपाशांनी त्या त्या ठिकाणच्या तुर्की अधिका-यांना, * इंग्रजांच्या हवाली हत्यारे करू नका, असा तुम्हांला सुलतानाचा हुकूम आहे,' असे संदेश पाठविले. या चळवळीची बातमी कॉन्स्टॉटनोपलमध्ये तांतडीने पोहोचली. इंग्रज अधिका-यांना अतिशय राग आला व त्यांनी सुलतानांस धमकी दिली. सुलतान गांगरून गेले. ६६ कमालपाशांना आपण बंड मोडण्याकरितां पाठवून दिले आणि तेच बंडखोरांचे पुढारी झाले; आपण कमालपाशांवर त्या ठिकाणीं पाठवून दिले हाच आपला मुर्खपणा झाला' असे सुलतानांस वाटू लागले. त्यांनी कमालपाशांना * ताबडतोब कॉन्स्टॅटिनोपल येथे हजर व्हा.' असा हुकूम पाठविला. हुकूम मिळाल्या बरोबर कमालपाशांनी सुलतानांस एक लांबलचक तार पाठवून, ' आपण तुर्कस्थानचे बादशहा आहांत, तुकचे नेते आहात. आपण जागे व्हा आणि परकीय शत्रूच्या विरुद्ध झगडणा-या तुर्की जनतेचे नेतृत्व स्वीकारा ' अशी विनंती केली. रात्रभर कमालपाशांनी तारेच्या उत्तराची वाट पाहिली. पहांटे त्यांना ताबडतोब परत येण्याबद्दल उत्तर आले. कमालपाशांनी परत जावयाचे साफ नाकारले. * राष्ट्रास स्वातंत्र्य मिळेपर्यंत आपण अनातोलीयांत राहणार !' अशी उलट तार त्यांनी सुलतानांस केली. सुलतानांनी ताबडतोब कमालपाशांना नोकरीतून बडतर्फ केल आणि त्यांच्या आज्ञा मानू नका, असे सर्व मुलकी व लष्करी ६ १३