पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/129

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

एकमेव पुढारी जागृती केल्यानंतर कमालपाशा इरझरमकडे वळले. या ठिकाणी त्यांचे कार्य फार सुखकर झाले. रशियन लोक काकेशस प्रदेशांमधून गेल्यानंतर तेथे इंग्रजांनीं, तुच्या सरहद्दीला लागून आर्मेिनियन लोकांचे प्रजासत्ताक राज्य स्थापण्यास मदत केली. ज्यावेळी तह होईल त्यावेळी इरझरम भोवतालचे तुर्की प्रांत तुमच्या राज्यास जोडण्यांत येतील असे इंग्रजांनी आर्मिनियन लोकांस अभिवचन दिले होते. या गोष्टीचा स्थानिक तुकना फार राग आला. आपला प्रांत, आपला मुलुख, दुस-याच्या हवाली करावयाचा ही कल्पनाच त्यांना असहय वाटली. * एक मरूं किंवा मारूं पण आर्मेनियन हुकुमती खाली जाणार नाही,' अशी त्यानी प्रतिज्ञा केली. हे सर्व तुर्क कमालपाशांना मदत करावयास एका पायावर सज्ज झाले. प्रत्येक ठिकाणी कमालपाशांचे ओजस्वी भाषण ऐकण्याकरिता लोकांची तोबा उडत असे. जनतेवर त्यांच्या भाषणाचा विलक्षण परिणाम होई. कमालपाशांनी पुकारलेल्या स्वातंत्र-युद्धांत हजारों लोकांनी नांवे नोंदविली, त्यांच्या लष्करी कवायती सुरू झाल्या. कित्येक ठिकाणी इंग्रज आणि फ्रेंच यांच्या सक्त पहाण्याखाली असलेली हत्यारे नि दारूगोळा यांची कोठारे तुर्कीनी लुटली व पुढलि उपयोगाकरितां त्यांचा पर्वतामध्ये सांठा करून ठेवला. ठिकठिकाणीं तुना निशस्त्र करावयाचे कार्य इंग्रज अधकारी करीत ११