पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३ ) | मुंबईचे सुभासद्ध नागरीक शेख अबदुल कादिर इंजिनीयर; शेठ इब्राहीम हसन मामू जी; ए, एम्, शेख बी. ए; एस. ए. मजीद बी. ए.; ए. आर. नाईक बी. ए.; मीर एम्. आय. कुरशी; एच्.ए.करोल; बार्शी (स्पनिंग व विव्हग भिल्स चे मॅनेजिंग डायरेक्टर जे. बी. आरवाडे; हैद्राबादचे काँटॅक्टर महमद हसन इमाम जाफर; वाईचे काजी साहेब; भाई मास्तर यांनी 'मुस्लिम मराठी साहित्यास ' स्वतः सहाय्य केले व मिळवून दिले याबद्दल त्याचे आभार मानावे तितके थोडेच आहेत. ‘मुस्लिम मराठी साहित्यास',माझ्या मुसलमान बांधवांप्रमाणे ज्या ब्राह्मण, मराठा, जैन, लिंगायत, खिश्चन बांधवांनी जातिधर्माचा विचार न करता मनोभावाने सहाय्य केले, त्यांचा मला कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला पाहिजे. मुस्लिम मराठी साहित्याचे पहिले प्रकाशन ‘गाझी कमालपाशा' आज महाराष्ट्रीय जनतेच्या सेवेशी सादर करीत आहे. सदर प्रकाशनाच्या वेळी चीफ ऑफ इचलकरंजी, हाजी अली महंमद, भि, उस्मानगनी हसन मुल्ला, ए. एम्. खताव यांनी स्पृहणीय सहाय्य केले त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. शेवट ‘मुस्मि मराठी साहित्य' कार्यास ज्यांनी आशिर्वाद, प्रोत्साहन आणि सहाय्य केले त्यांना व ‘मुस्लिम मराठी साहित्य जगविणा-या असंख्य महाराष्ट्रीय बंधुभगिनींना अत्यंत आदरपूर्वक प्रणाम करून त्यांची रजा घेतो. सर्वांचा नम्र, जानेवारी १९४२ ) सय्यद अहंमद अमीन. सांगली