पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३ ) आय्. सी. एस्. या थोर गृहस्थानीं 'भुस्लिम मराठी साहित्यास' शुभाशवद देऊन मला उपकृत केले आहे. मला पितृतुल्य असणारे सांगलीचे उदाराध नरेश, हिज हायनेस राजासाहेब यांच्या ऋणांतून कसे मुक्त व्हावें तें व मला कळत नाही. त्यांचे कृपाछत्र माझ्या शिरावर अमुल्यामुळे मी मराठी साहित्याची थोडीफार सेवा करू शकलो. मी एकादा संकल्प करावा आणि हिज हायनेस राजासाहेबांनी पितृप्रेमाने पाट थोपटून तो संकल्प पुरा करावयास प्रोत्साहन द्यावे, या नेइभांच्या सत्यस्थितीस अनुसरून माझ्या मुस्लिम मराठी साहित्याच्या संकल्पासही हिज हायनेस राजासाहेबांकडून प्रोत्साहन व आदि मिळाला आहे हे कृतज्ञतापूर्वक नमूद करू इच्छितो. । त्याचप्रमाणे पुण्याचे सुप्रसिद्ध महाराष्ट्रीय मुसलमान पंडित खानबहादूर शेख अबदुल कादिर सर्फराज एम् , ए., आय्. ई. एस्.; खानबहादूर बदिउझ्झमान काझी एम्, ए.; खानबहादूर शेख याकूब एम्. बी, ई., सी. एस्.; शेख बाकरअली बी. ई. एस्.; खानसाईब वाय्. डी. खान; प्रिन्सिपॉल एम्.. बी. हुसेन एम्. ए. बी. एससी, ( एडिंबरो ); प्रो. शेख चांद बी, ए, ऑनर्स ( लंडन ), बार-अंट-ला; मुंबईचे सुप्रसिद्ध सर्जन डॉ. एच्. वायु, ख्वाजा एफ्. आर, सी. एस्. एल्. आर. सी. पी, ( लंडन ) डी. एल्. आ.; एम्. एन्. खान एम्. ए. एल्एल, बी,; भि, ए. के. बी. काझी बी. एस्सी. ( एडिंबरो ), एन. डी. डी. ( स्कॉटलंड ), डी. आय, सी. ( लंडन ); ए. एल्. काझी बी. ए. एल्एल. बी.; शेख अबदुल अजीझ एम्. एस्सी. ( लंडन ) । प्रो. एम्. वाय्, ख्वाजा, आमदार अजीझ गफूर काझी एम्. एल्. ए, या नामवंत सद्गृहस्थांनी मला जे प्रेमळ प्रत्साहन दिले त्याबद्दल मी त्यांचा सदैव ऋणी राहीन.