पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/128

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गाझी कमालपाशा सैन्यांत आपले नांव दाखल करा! राष्ट्राचा विनाश थांबवावयाचा असेल, आपल्या घरादारांची व बायकापोरांची अब्रू सांभाळायची असेल तर आपणाला शत्रूचा प्रतिकार हा केलाच पाहिजे. कमालपाशांनी आपल्या प्रभावी वाणीने व व्यक्तिमत्वाने तुकच्या हृदयांत राष्ट्रप्रेमाची ज्योत पेटविली, त्यांच्या सुप्तभावनांना चेतना दिली, त्यांच्या थंडावलेल्या रक्तास उसळी आणली व त्यांचा जाज्वल्य स्वाभिमान जागृत केला. कमालपाशांनी शत्रूंचा प्रतिकार करण्याकरितां प्रत्येक खेड्यांत केंद्रे स्थापन केली. हे कार्य करीत असतांना त्यांना अतिशय त्रास झाला. वारंवार होणान्या युद्धामुळे लोकांच्या अंतःकरणांत त्राण उरला नव्हता. कशाही स्थितीत, कांहीं तरी करून जगावयाचे अशी त्यांची भावना झाली होती. पण, कालपाशांची प्रभावी वाणी ऐकल्यानंतर ते थोडथोडे जागे होऊ लागले. त्याचवेळी ग्रीक सैन्याने स्मनवर हल्ला केला असून तेथील तुकची घरदारे ते जाळीत आहे व त्यांची सर्रास कत्तल करीत आहे, अशी बातमी एकाद्या वणव्या प्रमाणे संबंध तुर्कस्थानभर पसरली. या घटनेचा फायदा घेऊन कमालपाशांनी तुकचा क्रोध चेतविला ! खेड्यापाड्यांतून जनतेमध्ये संतप्तपणाच्या लाटा वाढू लागल्या. प्रत्येक मनुष्य कमालपाशांच्या निशाणाखाली जमू लागला, अनातोलीयामध्ये ११७