पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/127

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

. प्रकरण १५ वें -XX--- एकमेव पुढारी,

- कमालपाशांनी खेड्यापाड्यांतून दौरा काढला, तेथील अधिकारी लोकांना आपली अंतिम इच्छा बोलून दाखविली, सैन्यामधील बेकार अधिका-यांना गोळा केले. * तुमचे राष्ट्र, तुमचा प्यारा तुर्कस्थान, शत्रूच्या कचाट्यांत सांपडला आहे. तुर्कस्थान नेस्तनाबूद करून त्याठिकाणी प्रकिस्थान करावयाचा शत्रूचा डाव • चालला आहे. तुर्कस्थानचा सुलतान, तुमचा बादशहा आज शत्रूचा कैदी होऊन बसल्यामुळे हताश झाला आहे. आतां तुम्हीच आपले रक्षण केले पाहिजे, तुम्हीच आपले राष्ट्र जगविले पाहिजे, तुम्हीच आपला मातृदेश वांचावला पाहिजे ! बाहेरून मदतीची अपेक्षा करण्यात अर्थ नाही. तुम्ही आपल्या मनगटावरच आपले अस्तित्व राखले पाहिजे. उठा, सज्ज व्हा आणि राष्ट्रीय