पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/124

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गाझं। कमालपाशा स्थानाला शत्रूच्या मगरमिठींतून सोडवून त्याला स्वतंत्र करण्याची त्यांची आकांक्षा होती, परकीयांच्या लाथा खाणा-या निखप तुर्कस्थानाला गदगद हालवून त्याच्या सत्वाची ओळख करून द्यावयाचे त्यांचे ध्येय होते, दोस्त राष्ट्रांच्या इच्छेस मान तुकविणाच्या गुलामी मनोवृत्तीच्या तुर्कस्थानाला स्वाभिमानी नि : स्वयंशासित करण्याचा त्यांचा संकल्प होता. तुर्कस्थान हा तुकीकरितांच आहे नि तुककारतांच राहील हे त्यांना जगाला पटवून द्यावयाचे होते. कमालपाशांची आकांक्षा, त्यांचे ध्येय, त्यांचा संकल्प सिद्धिस जाण्याची चिन्हें क्षितीजावर स्पष्टपणे दिसू लागली ! आपल्या ध्येयपूर्तीकरितां त्यांना तुझी सैन्याचे व लष्करी अधिका-यांचे साहाय्य हवे होते. पराक्रमी योद्धा म्हणून कमालपाशांचा लौकिक असल्यामुळे, तुर्की सैनिकांच्या मनांत त्यांच्याविषयीं गाढ आदर होता. त्यांच्या एका शब्दावर वाटेल ते दिव्य करण्याची लष्करी अधिका-यांची तयारी होती. अमासिया येथे आल्यावर त्यांनी सर्व प्रमुख ठिकाणी तारा करून जनतेची नाडी ओळखून घेतली. त्या प्रांतांत राहणा-या तुर्की वीरांना त्यांनी बोलावून घेतले व त्यांच्यासमोर आपले विचार मांडले. प्रतिकार हा एकच आपल्या राष्ट्राला स्वतंत्र करावयाचा उपाय आहे असे सर्वांनीं कबूल केले. त्या सर्वांनी मिळून प्रतिकार क्लसा १०६