पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/123

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तात्पुरते सरकार कमालपाशांना कैद करून माल्टा येथे पाठवावे हा इंग्रजांचा बेत आणि बंड मोडण्याकारतां आपला प्रतिनिधी म्हणून त्यांना अनातोलीयामध्ये पाठवावें ही सुलतानांची इच्छा; या दोहोमध्ये इंग्रजांचा बेत रहित झाला व सुलतानांची इच्छा फळाला आली. कमालपाशांना अनातोलीयांत पाठविण्याकरितां संमत्ती देण्यास फरीदपाशाने इंग्रजांना भाग पाडले. कमालपाशांचे दैव बलवत्तर म्हणून माल्टामध्यें जन्मभर कैदी होऊन राहण्याऐवजी सुलतानाचे प्रतिनिधी म्हणून अनातोलीयामध्ये जाण्याचा त्यांना मान मिळाला. त्यांचे नांव लवकरच अटक होणा-या अराजकांच्या यादींतून काढून टाकण्यात आले व त्यांची पूर्वप्रांतांचे गव्हर्नरजनरल म्हणून नेमणूक झाली. अनातोलीयास जाण्यापूर्वी कमालपाशा आपल्या आईचा निरोप घेण्यासाठी गेले. त्यांच्या आईने प्रेमभराने त्यांचे चुंबन घेतले व भरलेल्या डोळ्यांनी आपल्या पुत्रास आशिर्वाद दिला. कर्नल आरीफ व रफेतपाशा यांसह कमालपाशांनी कॉन्टैटिनापल सोडले. ब-याच त्रासदायक प्रवासानंतर ते समसन येथे १९ मे १९३९ रोजी उतरले व तेथून अमासिया येथे त्यांनी प्रयाण येलें. अमासिया येथे आल्याबरोबर कमालपाशांनी आपली आकांक्षा, आपले ध्येय, आपला संकल्प सिद्धीस नेण्याचा कृतनिश्चय केला. तुर्क १०५