पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/125

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तात्पुरते सरकार करावयाचा हे ठरविले. तुर्की टोळ्यांना जमवून त्यांचे राष्ट्रीय सैन्य तयार करावयाचे, हत्यारंपात्यारे गोळा करण्याकरिता ठिकठिकाणी केंद्रे स्थापावयाची आणि जनतेत जागृती करण्याकरिता पुढारी लोकांनीं गुप्त दौरे काढावयाचे; असा कार्यक्रम आंखला, हा सर्व कार्यक्रम त्यांना अत्यंत सावधगिरीने करावयाचा होता. इंग्रजांना याचा सुगावा लागला तर ते आपले प्रयत्न मुळासकट उपटून काढल्याशिवाय राहणार नाहीत अशी कमालपाशांची व त्यांच्या सहका-यांची बालंबाल खात्री होती. सुलतान इंग्रजांच्या हातांतील खेळणे झाल्यामुळे राष्ट्रोद्धाराच्या या कार्यास त्याचा पाठिंबा मिळणे शक्य नव्हते. शिवाय लढायांमुळे जनता इतकी कंटाळून गेली होती की, तिच्यामध्ये एकदम जागृती होईल अशी खात्री देववत नव्हती. तेव्हां या सर्व गोष्टींचा विचार करूनच कमालपाशांनी अत्यंत सावधगिरीने कार्यास हात घालावयाचे योजिले. स्वातंत्र्याची ही चळवळ योग्य नियंत्रणाखाली चालावी या दृष्टीने पश्चिम भागांत अलीफौदचे, पूर्व भागांत कझीम कारा बेकीरचे व मध्यभागांत कमालपाशांचे नियंत्रण असावे असे ठरल्यानंतर कमालपाशा म्हणाले, “ सुतान व तुर्की सरकार शत्रूच्या हातांतील बाहुली बनल्यामुळे,आपण अनातोलीयामध्ये एक तात्पुरते सरकार अवश्य स्थापन केले पाहिजे. कालपाशांच्या सहका-यांनी १६७