पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/122

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गाझी कमालपाशा अनातोलीयामध्ये सुप्तावस्थेत असलेल्या बंडाळीचा बीमोड करावयाचे इंग्रजांनी व सुलतानानी ठरविले. तेथील परिस्थिती काबूत आणण्याकरितां, बंडखोरांची हत्यारे काढून घेण्याकरितां, त्यांचे नुक्तेच उभे असलेले सैन्य मोडून टाकण्याकरितां आणि त्यांच्या चाललेल्या गुप्त सभा व बैठकी बंद करण्याकरितां कुणीतरी हुषार व पराक्रमी अधिकारी पाठविला पाहिजे असे सुलतानानी ठरविले व त्या महत्वाच्या कामगिरीवर कमालपाशांची नेमणूक करावयाचे नक्की केले; पण, इंग्रज लष्करी अधिका-यांनीं था नेमणुकस सक्त हरकत घेतली. कमालपाशांसारख्या एकेकाळीं क्रांतिकारक समजल्या जाणाच्या भयंकर माणसाला अनातोलीयामध्ये पाठविणे ह्मणजे आपल्या पायांवर आपण होऊन धोंडा मारून घेण्यासारखे आहे असे इंग्रज हायकमिशनरचे मत पडले. सुलतानांचा मेव्हणा व मुख्य प्रधान फरीदपाशा यांनी कमालपाशांबद्दल इंग्रजांजवळ रदबदली केली. ते म्हणाले, 5 कमालपाशांचा स्वभाव बंडखोर असला तरी ते सुलतानांच्या व आपल्या विरुद्ध जातील असे मला वाटत नाहीं. शिवाय राष्ट्रांत त्यांना अतिशय मान असल्यामुळे ते अनातोलीयास जातील तरच तेथील बंड मोडून जाईल. त्यांच्याखेरीज या कामाला योग्य असा दुसरा अधिकारीच आपल्याजवळ नाहीं.” १०४