पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रणाम ܚܐܠܗܙ १९४२ चे नवें साल उजाडले. या नव्या साली, ज्याच्या कृपेनें * मुस्लिम मराठी साहित्याची ' मुहूतमेढ रोविली जात आहे, त्या सर्व शक्तिमान परमेश्वरास प्रथम अनन्य भावाने प्रणाम करतो. | आतापर्यंत हजरत महंमद पैगंबर' व ' इस्लाम आणि नीतिशास्त्र' हे दोन मराठी ग्रंथ स्वतंत्रपणे प्रकाशित करून, मी मराठी साहित्याची अल्पशी व ओबडधोबड सवा केली आणि ती सेवा महाराष्ट्र जनतेने मोठ्या दिलदारपणाने गोड करून घेतली. यापुढे काही तरी विशिष्ठ ध्येय ठेवून मराठी साहित्याची सेवा करावी असा विचार आज वर्षभर चालला होता. आज त्या विचारास * मुस्लिम मराठी साहित्याचे ' मूर्तस्वरूप आले याबद्दल मनास अयंत धन्यता वाटते. ‘मुस्लभ मराठी साहित्याने आपल्यासमोर जे उज्वल ध्येय ठेवले आहे त्याचे विवरण या पुस्तकाच्या सुरवातीस विज्ञप्ती या सदराखाली केल्यामुळे, त्याची पुन्हा द्विरुक्त करावयास नका. मुस्लिम मराठी साहित्याची प्राणप्रतिष्ठा करतांना थोर महाभागांचे आशिर्वाद मिळाले याबद्दल अत्यंत धन्यता वाटते, अखिल महाराष्ट्रास ललामभूत होऊन राहणारे नेक नामदार न्यायमूर्ती एम. आर, जयकर यांच्यासारख्या विद्वर्षिचा सुवातीस शुभाशिर्वाद मिळाला ही भाग्याची गोष्ट होय, त्याचप्रमाणे मुंबई इलाख्याचे माजी पंतप्रधान ना, बाळासाहेब खेर, हिज हायनेस महाराजा ऑफ देवास (ज्यू ), साहित्याचार्य प्रो. वागन मल्हार जोशी एम्. ए., मि, बी. एन डे सी. आयु. ई,