पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/119

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

स्वातंत्र्याकरिता धडपड तुर्कस्थानांमधून काढून घ्यावयास सुरूवात केली. इकडे फ्रान्स, इटली व इंग्लंडमध्ये अंतर्गत राजकीय भानगडी उपस्थित होऊ लागल्या. लढाईचा परिणाम सर्व राष्ट्रांवर प्रखरपणे दिसू लागला. तिकडे दोस्त राष्ट्रांचे मुत्सद्दी पॅरिसमध्ये जमून जर्मनी विषयीं जोराची वाटाघाट करीत होते. तुर्कस्थानाकडे लक्ष द्यावयास त्याना सवडच नव्हती. अद्याप तहाच्या शर्ती पूर्णपणे अमलांत यावयाच्या होत्या. लॉईड जार्जचे सल्लागार म्हणाले " तुर्कस्थानला सोडून द्या. त्याचे आपोआप तुकडे पडतील. नंतर आपण ते तुकडे वाटून घेऊ. ही सर्व परििस्थती पाहून स्वातंत्र्याचा पुन्हा एकदां जोराचा प्रयत्न करावयास ही वेळ योग्य आहे अशी अंधुक आशा, निराश झालेल्या तुकीच्या अंतःकरणांत डोकावू लागली. तशा प्रकारचा प्रयत्न कॉन्स्टॅटिनोपलमध्ये करणे शक्यच नव्हते;कारण तेथे इंग्रजांची सुलतानवर नि शहरावर जबरदस्त पकड होती. त्यामुळे कुठलीही हालचाल करणे ह्मणजे मृत्यूस आव्हान देण्यासारखे होते. मात्र अनातोलीया सारख्या दूरच्या व डोंगराळ जागी कांहीतरी हालचाल करणे शक्य होते आणि त्या प्रमाणे ज्यांच्या अंत:करणांत आपल्या राष्ट्राविषयीं भक्ति आणि तळमळ होती अशा अनेक तुर्कनी तशा प्रकारची हालचाल करण्याचे ठरविले. या हालचालीस मदत करण्याकरितां खद्द कॉन्स्टॅटिनोपलमध्ये दहाबारा गुप्त संस्था स्थापन केल्या. शत्रूंच्या नियंत्रणाखाली असलेली हत्यारे व दारू १०१