पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/118

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गाशी कमालपाशा नांची भेट घेतली व त्यांस सांगितले, 4 शत्रूला तोंड देण्याकरितां, त्यांच्याशी बरोबरीच्या नात्याने वागण्याकरितां, राष्ट्रांत जो न्यूनगंड पसरला आहे तो नष्ट करण्याकरितां सध्या अस्तित्वात असलेले मंत्रीमंडळ काढून टाका. माझ्याकडे युद्धमंत्र्याचे काम दिले तर मी अजूनही तुर्कस्थानाचा बचाव करू शकेन. या पार्लमेंटचे ताबडतोब विसर्जन करा. पार्लमेंटचे अर्धेअधिक सभासद राष्ट्राचे दुष्मन आहेत व बाकीचे भित्रे आहेत. परिस्थितीस तोंड कसे द्यावे हे त्यांना कळत नाही. त्यांच्यामध्ये एकही निधड्या वृत्तीचा मनुष्य नाहीं.

  • आपली गोष्ट कबूल करावयास हरकत नाही.आपले सैन्यावर फार वजन आहे. ते सैन्य माझ्याशी राजनिष्ठ राहील अशी तुम्ही खात्री देतां काय ? " सुलतानांनी सवाल टाकला. ।
  • पण ते सैन्य राजनिष्ठेपासून च्युत होईल असे मला वाटत नाहीं,' कमालपाशांनी उत्तर दिले.
  • सैन्य राजनिष्ठ राहील अशी खबरदारी घ्या. मी उद्या पार्लमेंट बरखास्त करतो, " सुलतान म्हणाले.

सुलतानांनी सांगितल्याप्रमाणे पालमैट बरखास्त केले.आपला मेव्हणा फरीदपाशा याला मुख्य प्रधान करून सर्व सूत्रे त्याच्या ताब्यात दिली. सन १९१९ साल उजाडले. तुर्की राष्ट्रावरची दोस्त राष्ट्रांची पकड ढिली पडू लागली. त्यांनी आपआपलें सैन्य