पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/120

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गाझी कमालपाशी गोळा चाख्न अनातोलयाकडे पाठविणे, ज्या ठिकाणी लाके गोळा होणे शक्य आहे असे अड्डे तयार करणे, कार्यक्रम आंखणे वगैरे कार्य या संस्थांकडून करण्याचे ठरले.मोठमोठ्या दर्जाच्या अधिकारी लोकांनी शक्य तितकी मदत करावयाची आश्वासने दिली.इस्मतपाशा हे युद्धखात्याचे अंडर सेक्रेटरी होते, फिवझी लष्करी खात्याचे मुख्य होते, फतेही अतर्गत खारभाराचे प्रमुख होते व सैफ नाविक दलाचे मुख्य अधिकारी होते. ही सर्व बडी मंडळी कमालपाशांची जिगरदोस्त होती. त्यांना स्वातंत्र्याचे प्रयत्न यशस्वी होण्यास सर्व प्रकारची मदत करावयाचे ठरविले.अनातोलीयाच्या डोंगराळ भागांत शत्रूचा प्रतिकार करण्याकरितां दहाबारा ठिकाणी लप्करी केंद्रे उघडण्यात आली. रशियन सरहद्दीवर केझीम कोरा बेकार आपल्या सहा लष्करी तुकड्यासह तयार होते. प्रतिकाराच्या या गोष्टी कमालपाशांच्या प्रेरणेनेच घडत होत्या.प्रत्येक गोष्ट त्यांच्या सल्यानेच ठरत होती; पण कमालपाशांनी आपण या सर्व भानगडीपासून अलिप्त आहेत असे मोठ्या सफाईने भासविलें. स्वातंत्र्याची ही शेवटची धडपड यशस्वी होणार काय? - --- १०३