पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/117

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

स्वातंत्र्याकरितां धडपड इज्जतपाशा व कमालपाशा या दोघांनी बराच वेळ विचारविनिमय केला.शेवटीं कमालपाशा म्हणाले, ज्यांना आपण शत्रू समजत होतो त्या दोस्त राष्ट्रांच्या आजळीने पाणी पिणारी ही निर्जीव राजवट बदलून तिची भक्कम पायावर आपणांस स्थापना केली पाहिजे. इंग्रजांपुढे माना तुकविणा-या व त्यांची हांजी हांजी करणाच्या तौफीकपाशा सारख्या मुख्य प्रधानास काढून टाकून तुम्ही स्वतः मुख्य प्रधान व्हा. मी युद्धमंत्र्याची जबाबदारी पत्करतो. आपण दोघे मिळून आपल्या राष्ट्राची लाज राखण्याचा प्रयत्न करू या! इज्जतुपाशांच्या सहाय्याने कमालपाशांनी या निर्धाराप्रमाणे एक स्वतंत्र पक्ष स्थापन केला. या पक्षाला बरेच लष्करी अधिकारी व मुत्सद्दी मिळाले; पण तुर्का पार्लमेंटचे सभासद वश होईनात. पार्लमेंटच्या सभासदांना कमालपाशांनी स्पष्टपणे व आग्रहपूर्वक सांगितले की, ' तौफीकपाशांची प्रधानपदावरून उचलबांगडी केल्यावाचून राज्याची घडी नीट बसणार नाहीं; जोपर्यंत तौफीक पाशा मुख्यप्रधान. आहे तोपर्यंत शत्रू . आपल्या घरांत आहे असेच समजा. पार्लमेंटच्या सभासदांनीं वरकरणी कमालपाशांच्या विधानाला मान्यता दिली; पण ज्यावेळी पालमेंटमध्ये तौफीकपाशांचा प्रश्न निघाला त्यावेळी बहुतेक सर्वच सभासदांचे पारडे तौफीकपाशाकडे झुकले. कमालपाशांनी ताबडतोब सुलता