पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/116

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गाझी कमालपाशा शत्रुंच्या हुकमतीखाली तुर्की सरकार एकाद्या गुलामाप्रमाणे त्यांच्या आज्ञा निमूटपणे मान्य करीत होते. | अंगावर शहारे आणणारे हे दृष्य पाहून कमालपाशांना भडभडून आले, आपल्या राष्ट्राची चाललेली धूळधाण पाहून त्यांच्या अंतःकरणांस तीव्र वेदना झाल्या, आपल्या मातृदेशावर शत्रुनी घातलेला दरोडा पाहून त्यांच्या चेह-यावर विषण्णता पसरली. आपल्या राष्ट्रास स्वयंशासित व बलवान करावयाच्या त्यांच्या कल्पना धुळीस मिळाल्या; त्यांचे मनोरथ कोसळून पडले ! शिकस्तीचे प्रयत्न करूनही दैवाने शेवटीं दगा दिला, याबद्दल त्यांना अतिशय वाटले. आपल्या डोळ्यांदेखत शत्रूनी आपल्या राष्ट्राची विटंबना करावी याबद्दल त्यांना अत्यंग उद्वेग वाटला. कमालपाशांनी भरलेल्या डोळ्यांनी पण अंतर्मुख दृष्टीने सभोवार पाहीले. क्षणांत त्यांचा दुर्दम्य आशावाद जागृत झाला. अजूनही आपल्या राष्ट्रांत नवचेतना निर्माण करता येईल, अजूनही आपल्या मातृदेशास परकीयांच्या पकडीतून सोडविता येईल, अजूनही आपश्या जन्मभूमीस सुखाचे दिवस दाखविता येतील असे महत्वाकांक्षी विचार त्यांच्या अंतःकरणांत उचल खावू लागले. ते तडक इज्जतपाशाकडे गेले व त्यांना आपले विचार बोलून दाखविले.