पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/115

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

स्वातंत्र्याकरितां धडपड दृष्टीस पडे. माणसांनीं सदैव गजबजलेली कॉफीगृहे निर्मनुष्य दिसत होती. शहराचे सुतकी स्वरूप पाहून कमालपाशा यांचे अंतःकरण विषण्ण झाले. सर्वे शहर शत्रूच्या ताब्यात होते, बास्फरस सामुद्रधुनींत इंग्रजांच्या युद्धनौका संथपणे विहार करीत होत्या, दादनेलीसच्या नाक्यावर इंग्रजांचा पहारा बसला होता, फ्रेंच सैनिक शहरामध्ये मोठ्या दिमाखाने वावरत होते, रेल्वेवर इटालीयन सैन्याचा कबजा झाला होता, दोस्त राष्ट्रांचे आधिकारी पोलीस खात्यावर, लष्करावर व बंदरावर सत्ता गाजवीत होते ! दोस्तांच्या सैनिकांनी तुकचे लष्करी किल्ले व ठाण उध्वत करण्याचा सपाटा चालू ठेवला होता, तुकच्या फलटणी बरखास्त करून, तुर्की सैनिकांना घरोघर रवाना करण्याचे कार्य सुरू होते. । वैभवशाली तुर्की साम्राज्य आज धुळीला मिळालें! ज्या युरोपियन राष्ट्रांना एकेकाळीं तुर्कस्थानाने दांती तृण धरावयास लावले त्याच युरोपियन राष्ट्रांच्या पायाशी, गलित झालेला तुर्कस्थान विव्हळत पडला. तुर्की साम्राज्याच्या चिंधड्या उडाल्या; ईजिप्त, सीरीया, इराक आणि अरबस्थान हे सर्व प्रदेश तुकच्या हातून गेले. तुर्कस्थानच्या मंत्रीमंडळाचा बोजवारा उडाला. अनवरपाशा, तलात आणि जमील हे प्रसिद्ध मंत्री फरारी झाले; दोस्त राष्ट्रांच्या