पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/114

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

। प्रकरण १३ दें। - –XX स्वातंत्र्याकरितां धडपड ।

    • se -- राजधानस ताबडतोब निघून या अमा मुख्य प्रधानांचा हुकूम आल्यामुळे, सैन्याची सूत्रे दुस-या अधिका-यांच्या हाती देऊन कमालपाशांनी राजधानीस प्रयाण केले. ते राजधानीस येऊन पोहोचले त्यावेळी युद्ध तहकूब होऊन जवळ जवळ एक महिना झाला होता. राजधानीस येऊन पाहतात तो कमालपाशांच्या दृष्टीस काय दृष्य पडले !

. सबंध शहरांत भयाण शांतता पसरली होती. रस्त्यामध्ये एकही तुर्की मनुष्य दिसत नव्हता. घरादारांचे दरवाजे व खिडक्या बंद केलेल्या दिसत होत्या, झुळझुळ वाहणारे निर्झर शुष्क झाले होते. शहरांतील बाजारपेठ ओसाड पडल्यासारखी दिसत होती. ज्याठिकाणी हजारों लोकांची रिघ लागावयाची त्याठिकाणी एखादा दुसरा मनुष्य तोही खाली मान घालून बाजूला निघून जात असलेला