पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गाझी कमालपाशा प्रकारची मदत मिळेना. इंग्रजांचे अफाट सैन्य व त्यांना सहानुभूती दाखविणारी व मदत करणारी अरब प्रजा यापुढे तुर्की सैन्याचा निभाव लागणे कदापिही शक्य नव्हते. शेवटीं कमालपाशांनी तेथून आपले सैन्य हलविलें व मागे अलेपो येथे नेले. तेथूनच शत्रूशी लढत राहून तुर्कस्थानला वाचविण्याचा त्यांनी बेत केला. अलेपो येथे आल्यानंतर कमालपाशांनी आपला सैन्याची पुनर्घटना केली आणि त्यांच्यामध्ये नवचेतना पैदा केली. अरबांचा पुढारी लारेन्स याने, “ तुर्कस्थानाने शांततेचा तह करावयास सुलतानांना भीड घालावी आणि चाललेला हा संहार थांबवावा,' अशी कमालपाशांना सूचना पाठविली; पण ही सूचना कमालपाशांनी तिरस्कारपूर्वक फेटाळून लावली. आपल्या सैन्याची स्थिती शक्य तो स्थिर व मजबूत करण्याची त्यांनी तयारी चालविली. | तारीख २६ अक्टोबरला जोधपूर व म्हैसूर घोडेस्वार सैनिकांनी तुकवर हल्ला चढविला. तुकची व हिंदी घोडदळाची जोराची चकमक सुरू झाली. यावेळी कमालपाशा आघाडीवर राहून आपल्या सैन्यास प्रोत्साहन देत होते. तुर्कोनी आपल्या पराक्रमाची व बहादुरीची कमाल करून टाकली. हिंदी १४