पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/111

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युध्दतहकूब गोष्टीचा फायदा मिळू नये असा अरबांचा कटाक्ष होता. अरब लोकांच्या या पिसाट व तुर्कस्थानविरोधी वृत्तीमुळे तेथील परिस्थिती अत्यंत चिंताजनक होऊन बसली होती. कमालपाशांनी न डगमगतां सैन्यामध्ये सुधारणा करण्यास व त्यांच्यामध्ये शिस्त निर्माण करण्यास सुरवात केली. कमालपाशांना रात्रंदिवस विश्रांती नव्हती. या दगदगीमुळे कमालपाशा आजारी पडले व त्यांना तीन आठवडे अंथरूणावर पडून राहावे लागले. १९ तारखेस इंग्रजांचा मोठा हल्ला होणार हे कळतांच कमालपाशा ताडकन् अंथरूणावर उठून बसले; त्यांच्या अंगांत ताप होता तरी त्याची पर्वा न करतां आपल्या सहका-यांशी विचारविनिमय करून इंग्रजांना तोंड देण्याची त्यांनी तयारी केली. | ठरल्याप्रमाणे इंग्रजांच्या सैन्याचा जबरदस्त हल्ला झाला. त्या हल्लयापुढे तुकीचा निभाव लागणे कठीण दिसू लागले. इंग्लीश विमानांनीं तु सैन्यावर भयंकर बॉम्बवर्षाव सुरू केला. त्या वर्षावापुढे व इंग्रजांच्या तोफांच्या माध्यापुढे तुर्की सैन्याची दाणादाण झाली. कमालपाशांनी न डगमगतां आपल्या सैन्यास • धीर दिला; शत्रू तोंड देण्याची शिकस्त केली; पण कांहीं इलाज चालेना. त्यामध्ये दु:खाची गोष्ट ही की, त्या प्रदेशांतील सर्व अरब इंग्रजांना मिळाल्यामुळे, त्यांच्याकडून कुठल्याही १३