पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/110

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गाझी कमालपाशी तरी तुम्ही कसे करता ? ' कमालपाशांचा पहाडी आवाज त्या दिवाणखान्यांत घुमत राहिला. सर्व अधिकारी स्तिमित होऊन कमालपाशांकडे पहात राहिले. आगष्ट महिन्यांत कमालपाशा सीरीयामधे येऊन पोहोचले. तेथील तुर्की सैन्याची स्थिती अत्यंत शोकजनक असल्याचे त्यांना दिसून आले. तुर्की सैनिकांची आबाळ झाली होती. त्यांना खावयास पुरेसे अन्न नव्हते, पेहरावयास भरपूर कपडा नव्हता,कडक उन्हाळ्यामुळे पाण्याची जबरदस्त टंचाई भासत होती; विशेषतः सैन्यामध्ये आमांशाचा आजार पसरल्याळे सर्व सैनिक हवालदिल झाले होते. मोठ्या मिनतवारीने तुर्की सैनिक खंदकामध्ये इंग्रजांच्या प्रतिकारार्थ कसेबसे दिवस कंठीत होते. याच्या उलट इंग्रजांच्या सैन्याची स्थिती होती. त्यांच्या अन्नाचा पुरावळा भरपूर होता; औषधपाण्याची उत्कृष्ट व्यवस्था होता; दारूगोळा, तोफा, विमाने किती तरी जास्त होती. तुर्कजवळ पाहिले तर फक्त आठ विमाने व दोन विमान विध्वंसक तोफा होत्या ! अमीर फैसलचे अरब प्रजाजन इंग्रजांना मिळाले होते. टी. ई. लॉरेन्स या इंग्लीश अधिका-याच्या नेतृत्वाखालीं अरब लोकांनी तुकविरुद्ध धुमाकूळ माजविला होता. रेल्वे, टेलीग्राफ, पूऊ यांचा विध्वंस करण्यास सुरवात केली होती. तुर्कीना कुठल्याही

  • ९२