पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/109

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युद्धतहकूब सैन्यांत नाहीं हे आपणाला ऐकून माहीत असेलच. आपल्या बुद्धिमत्तेच्या व तलवारीच्या जोरावर त्यांनी तुर्कस्थानाला अनेक वेळां वाचविले आहे." नंतर कमालपाशांकडे वळून ते ह्मणाले, ४६ आज आपली नेमणूक मी सीरीयामध्ये करीत आहे. तेथील परिस्थिती अत्यंत बिकट आहे. आपण त्याठिकाणी गेलात तरच सीरीयाची धडगत आहे; नाहीतर तो प्रांत शत्रूच्या हातांत गेला असेच समजा. आपण हे कार्य यशस्वीतेने कराल अशी मला पूर्ण खात्री आहे.' सुलतानांचा निरोप घेऊन कमालपाशा दिवाणखान्यांतून बाहेर पडत असतां एक जर्मन अधिकारी म्हणाला, “ त्या ठिकाणच्या तुर्की सैन्यामध्यें दम नाही किंवा धैर्य नाहीं. मेंढरासारखे पळावयाचे मात्र त्यांना माहीत आहे " हे उद्गार कानी पडतांच कमालपाशा चटकन फिरून त्या अधिकाच्या समोर जावून उभे राहिले. त्यावेळी संतापानें कमालपाशांचे सर्व शरीर थरथर कांपत होते. तुक लोकांची निंदा आणि तोही जर्मन लोकांकडून ऐकून त्यांच्या पायाची तिडीक मस्तकास गेली. ते ओरडून म्हणाले, ४६ तुक शिपाई कधीही पळून जाणार नाहीं. माघार हा शब्दच त्यांच्या कोशांत नाहीं. पळपुटेपणा हा तुम्हांलाच जास्त शोभून दिसेल. तुमच्या दुर्गुणाबद्दल तुर्की लोकांना नांवे ठेवावयाचे धाडस ९१