पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/108

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गाझी कमालपाशा युद्धाविषयी बोलणे निघाले असतां कमालपाशा स्पष्ट ह्मणाले, * आपला पराभव होणार हे आपणांस दिसतच आहे. जर्मन अधिका-यांच्या हाती असलेला तुर्की लप्कराचा ताबा आपण आपल्या हातांत घ्यावा. जर्मनशी असलेले दोस्तीचे नाते तोडून आपण ताबडतोब स्वतंत्रपणे तह करावा, हेच तुर्कस्थानच्या कल्याणाच्या दृष्टीने इष्ट ठरणार आहे. जर्मनीच्या नादाला आपण लागलों तर सर्वस्वास मुकू, हे आपण लक्षात ठेवा.'

  • आपल्यासारखे आणखी क्रिती लष्करी अधिका-यांचे मत आहे.

सुलतानांनी विचारले. ६ पुष्कळ आधिका-यांचे मत माझ्याप्रमाणेच आहे."

  • या गोष्टींचा योग्य विचार करूं, " असे सुलतानांनी आश्वासन दिले. कांही दिवसांनीं कमालपाशांना सुलतानांचे एकाएकी बोलावणे आल्यावरून ते राजप्रासादांत गेले. त्यावेळी सुलतानांच्या सभोवार बरेच तुर्की व जर्मन लष्करी होते. कमालपाशांचे सुलतानांनीं सस्मित स्वागत केले. जर्मन लष्करी अधिका-यांकडे वळून सुलतान म्हणाले, “ कमालपाशा हे अत्यंत योग्यतेचे लष्करी अधिकारी असून, यांच्यावर माझा अतिशय विश्वास आहे. त्यांची तोडीचा लष्करी अधिकारी आमच्या तुर्की

९७