पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गाझी कमालपाशा जर्मनहून परत जाण्याच्या अगोदर पश्चिम आघाडीची प्रत्यक्ष पाहणी करण्याचा कार्यक्रम आंखला होता; पण प्रत्यक्ष रणांगणावर जावून पहाणी करण्याचे युवराजांनी नाकारले. शेवटी कमालपाशा एकटेच जर्मन अधिका-यांसह आघाडीवर गेले व त्यांनी आघाडीवरील खंदकांची पाहणी केली. नंतर शत्रूची टेहळणी करण्याकरिता एका झाडावर बांधलेल्या टेहेळणगृहामध्ये जाऊन तेथून शत्रूची होत असलेली हालचाल न्याहाळी. तेथून . परत आल्यानंतर ते युवराजांना म्हणाले, वरवर पहाणान्यांना जर्मनीला यश मिळेल असे वाटते; पण खरी वस्तुस्थिती तितकीशी आशादायक नाही, असे माझे मत आहे. युवराजांचे राजधानीमधील सर्व कार्यक्रम संपल्यानंतर ते आपल्या परिवारासह तुर्कस्थानला परत जाण्यास निघाले. --