पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जर्मन राजधानींत जर्मनीचे बादशहा कैसर यांनी युवराजांच्या सन्मानार्थ एक मोठा खाना दिला. खाना झाल्यानंतर कमालपाशा हिंडेनबुगच्याजवळ उभे होते. ते म्हणाले ८ मेहेरबान,आपण सिरीयाच्या परिस्थितीविषयीं जी माहिती युवराजांना सांगितली ती अत्यंत चुकीची आहे. मी त्याठिकाणी बरीच वर्षे काढली आहेत व त्यामुळे तेथील खरी परिस्थिती काय आहे हे मला पूर्णपणे माहित आहे. जगामध्ये लष्करीशाश्वत अत्यंत निपुण समजल्या गेलेल्या व्हॉन हिंडेनबुर्गीना, कमालपाशांच्या निधडेपणाबद्दल आश्चर्य वाटले. यापेक्षां कमालपाशांनी जास्त बोलू नये म्हणून हिंडेनबुगनीं त्यांना सिगारेट ओढावयास दिली. कोणी चुकीची व अप्रबुद्धपणाची गोष्ट सांगितली तर ती कमालपाशांना सहन होत नसे. ते ताबडतोब भडिभाड न ठेवतां त्याची चूक स्पष्टपणे दाखवून देत असत. त्याचप्रमाणे त्यांच्या राष्ट्रीयत्वास धक्का लावलेले त्यांना खपत नसे. एक दिवस आलास्काच्या गव्हर्नरने खाना दिला. त्यावेळी त्याने तुकच्या राष्ट्रीयत्वाविषयी शंका प्रदर्शित केल्याबरोबर कमालपाशा ताडकन उठून उभे राहिले व त्यांनी गव्हर्नरचा योग्य शब्दांनी खरपूस समाचार घेतला. कमालपाशांचा रुद्रावतार पाहून गव्हगर्नरने ताबडतोब माफी मागितली.