पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गाझी कमाई कमालपाशांनी आपल्या खास डब्यांत भेटावे अशी युवराजांची इच्छा आहे असे एका लष्करी अधिका-याने सांगितले. कमालपाशा युवराजांचा डब्यांत गेल्यावर, युवराजांनी कमालपाशांचे स्वागत केले. अद्याप आपल्या सारख्या पराक्रमी वीराची ओळख करून घेण्याचा योग आला नाही याबद्दल त्यांनी कमालपाशांची क्षमा मागितली. थोड्याच वेळांत दोघांची गट्टी जमली व बलनपर्यंतचा सर्व प्रवास त्यांनी एकाच डब्यांतून केला. बर्लीन येथे पोहोचल्यानंतर स्टेशनवर तुर्कस्थानाच्या युवराजांचा यथोचित सत्कार करण्यात आला. नंतर त्यांना मुख्य लष्करी ठाण्यावर नेण्यांत आले. त्याठिकाणी जर्मनीचे भीष्माचार्य व्हॉन हिंडेनबुग यांनी युवराजांचे स्वागत केले. युवराजांना लढाईची सर्व परिस्थिती समजावून देण्यात आली; विशेषतः सिरीयाच्या सरहद्दीवरील परिस्थिती अत्यंत आशादायक आहे असे सांगण्यांत आले. तेथून परत आपल्या निवासस्थानी आल्यावर कमालपाशा युवराजांना म्हणाले, “ सिरीयाच्या सरहद्दीबद्दल व्हॉन हिंडेनबुगनीं जी माहिती सांगितली ती अत्यंत चुकीची आहे. जर्मन सैन्याधिकान्याला तेथील परिस्थितीचे चुकीचे ज्ञान असावे ही गोष्ट अत्यंत शोचनीय आहे ? ८६