पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/103

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जर्मन राजधानींत सहानुभूती नव्हती. तुर्कस्थानच्या लष्करी कारभारांत जर्मन लोकांचे झालेले प्राबल्य त्यांना सहन होत नसे. तुकसारख्या लढाऊ जातीने उठल्या सुटक्या जर्मन लोकांच्या जळीने पाणी प्यावे ही गोष्ट त्यांच्या मनांत शल्यासारखी लागून राहिली होती. खासगी किंवा सार्वजनिक ठिकाणी ते या गोष्टींचा निषेध करीत व जर्मन लोकांचा तुर्कस्थानांत शिरकाव करून दिला म्हणून अनवरपाशांना दोष देत. जर्मनी में किती पहिल्या प्रतीचे राष्ट्र आहे व तेथल लष्कराधिकारी किती कार्यक्षम आहेत हे कमालपाशांच्या मनावर बिंबवून त्यांच्या मनांत जर्मन लोकांविषयीं जी अढी बसली होती ती काढून टाकण्याचा अनावरपाशांचा बेत होता. ठरलेल्या दिवशीं तुर्कस्थानचे युवराज बर्लिनला जाण्यासाठी खास आगगाडीने निघाले. त्यांच्याबरोबर राजवाड्यावरफुल हांजीखोर नि अजागळ लोकांचा ताफा बरोबर होताच. या सर्व लवाजम्याबरोबर जर्मनीला आपल्या सारख्या माणसाने जावयाचे ही गोष्ट कमालपाशांना कशीशीच वाटली. आपण युवराजाबरोबर निघण्यास संमत्ती दिली हा आपला मूर्खपणा झाला, असें कमालपाशांना वाटू लागले. कमालपाशांच्या विचाराबरोबर युवराजांची खास आगगाडीही माग आक्रमू लागली. तुर्कस्थानाची सरहद्द ओलांडल्याबरोबर,