पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/102

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण ११ वें -xx जर्मन राजधानत p > रजा घेतल्यानंतर कमालपाशा आपल्या आईबहिणीसह कॉस्टॅटिनोपल येथे तीन महिने राहिले. हा तीन महिन्यांचा काळ त्यांना अतिशय कष्टाचा गेला. कामाशिवाय आळसांत घालविलेला एकएक दिवस त्यांना वर्षासारखा वाटू लागला. त्यांना करमेना किंवा कुठेही मन लागेना. आपली जा संपते केव्हां आणि आपण नोकरीवर हजर होतो केव्हां असे त्यांना होऊन गेले. सन १९१८ च्या वसंत ऋतूंत तुर्कस्थानाच्या युवराजांनी जर्मन राजधानीस भेट देण्याचे ठरल्यामुळे, युवराजांबरोबर जर्मनीस जाण्याचा कमालपाशांना हुकूम झाला. अनवरपाशांनीं कमालपाशांना जर्मनराजधानीच्या कामगिरीवर मुद्दाम पाठविण्याचे योजिलें. कमालपाशांना जर्मन लोकांविषयी