पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

महायुद्धांत ज्ञान जर्मन अधिकाच्यापेक्षा आपल्यास जास्त आहे. तेव्हां अशा आणीबाणीच्या प्रसंगी जर्मन सेनानीच्या हुकमतीखाली काम करणे आपण केव्हांही पसंत करणार नाही' असे त्यांनी युद्धमंत्र्यांना साफ कळविले. अलेपो येथे झालेल्या युध्दावषयक सभेस युध्दमात्र जमील, कमालपाशा, फकन हॅन व बरेच जर्मन अधिकारी हजर होते. सभेमध्ये कमालपाशांनी त्या जर्मन सेनानीची आंखणी किती चुकीची आहे हे स्पष्टपणे दाखविले. बगदाद घेण्याचा प्रयत्न करणे व सुएझ कालव्यावर हल्ला करणे या दोन्ही गोष्टी आजच्या परिस्थितीत अशक्यप्राय असून, त्यांत कधीही यश येणे शक्य नाहीं, 'कमालपाशांचे हे उद्गार ऐकून त्या जर्मन सेनानीला संताप आला. युद्धमंत्र्यांनी त्याची कशीबशी समजूत काढली व त्या जर्मन अधिका-याची आखणी योग्य आहे असे ठरविले. अशी मूर्खपणाची आखणी व बेत करून, अपयश पदरांत घेण्यापेक्षा आपण राजीनामा दिलेला बरा,' असा विचार करून कमालपाशांनी आपला राजीनामा सादर केला. युध्दमंत्र्यांनी राजीनामा परत घेण्याबद्दल त्यांना परोपरीने सांगितले; पण, त्याचा कांहीं उपयोग झाला नाहीं. शेवटीं कमालपाशांना दीर्घ मुदतीची आजारी रजा देण्यात आली. --