पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/94

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

अवधान राजकारणाकडे असते. मोसल येथे आपसांतले झगडे विशेष आढळतील. धर्माचा व जातीचा विचार बसऱ्याचे लोक करीत नाहीत, पण बगदादला मात्र अमका हिंदी, तमका यहुदी, तिसरा आर्मीनियन असे भेद मनांत आणणारे विचक्षणी जन आहेत. या तिन्ही विलायतींपैकी बसरा आणि बगदाद या दोन महत्त्वाच्या असल्याने प्रस्तुत प्रतिनिधीने तिसऱ्या विलायतेची यात्रा केली नाही.
 बसऱ्यांत 'हिंदी असोसिएशन ' म्हणून एक संघ आहे. युद्धकालीं तेथे बरीच हिंदी मंडळी होती. तेव्हा त्या संघाचे कामही जोरांत चालत असे. पण युद्धोत्तर कालांत हिंदी लोक जसजसे स्वदेशी परतले तसतसे त्या संघाच्या चळवळीचे स्वरूप आखडूंं लागले. शेवटीं तर कांही काल संघ जवळजवळ बंद झाल्यासारखाच होता. पण तेथील जनतेत थोडीशी जागृति केल्यावर पुनः ताज्या दमाने कामास प्रारंभ झाला आहे. हिंदुस्थानांतील सर्व संघांना उदाहरण घालून देण्यासारखाच प्रघात बसण्याच्या हिंदी संघाने पाडला आहे असे म्हणता येईल. 'व्यक्ति तितक्या प्रकृति ' ही म्हण अक्षरशः खरी असल्याने संघांत मतभेदाचे वारें शिरून कार्य थंडावते. या संघाची धुरा आंग्लविद्याविभूषित पदवीधर अशा स्त्रीने स्वीकारली आहे. आणि मिसेस सॅम्युएल या अध्यक्ष होतांच संघाच्या कार्यात पुढे कोण जातो अशी अहमहमिका कार्यकारी मंडळांत उत्पन्न झाली. इतकेच नव्हे, तर बसऱ्यांतील इतर हिंदी भगिनींनी आपआपल्या परींनी कार्यभाग उचलण्याची सिद्धता दर्शविली.

 हिंदुस्थानच्याच वांटयाला बॅरिस्टर सावरकरांसारखें नररत्न आलें असावें असा ग्रह होता. त्यांच्यासारखी कडक तपश्चर्या करणारे राष्ट्रसेवक आणि त्यांचा नाहक छळ करणारें खुनशी सरकार अशी

८८