पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/95

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गांधी, वुइल्सन व फैजल

जोडी बसऱ्यासही पहावयास मिळाली. अर्थातच त्यांतील एक गडी कोण हे न सांगतांचे समजण्यासारखे आहे. दुसऱ्या गड्याचें नांव कदाचित् हिंदुस्थानपर्यंत पोहोचले असावे. सय्यद तालीबु पाशा यांनी पहिल्या इराकी मंत्रिमंडळांत अंतस्थ मंत्र्याचे काम केले होते. पण त्यांनी इराकच्या स्वयंनिर्णयाची चर्चा केल्यामुळे १९२१ सालीं त्यांना 'लंकापुरी'चा तीन वर्षे वास घडला ! केवढा घोर अपराध ! तत्पूर्वी हिंदुस्थान, ईजिप्त या देशांचे हवापाणी त्यांस पहावयास मिळाले होते ! यांच्या राष्ट्रप्रेमाच्या गोष्टी इतक्या स्फूर्तिदायक आहेत की, या लिहितांच येत नाहीत. सध्या उपरिनिर्दिष्ट इराकपुत्राला बसऱ्यापासून चारपांच मैलांवर ठेवले आहे. आणि अशा राष्ट्रभक्ताचे दर्शन घेण्यासाठीच –कारण राजकारणाची चर्चा त्यांनी करूं नये अशी आज्ञा आहे- प्रस्तुत प्रतिनिधीने खटपट केली, परंतु काही कार्यासाठी ते हिंदुस्थानला गेले असल्याचे कळलें !

 बसरा येथे एक महत्त्वाची शाळा आहे. एक अमेरिकन मिशनरी गृहस्थ अरवी भाषेचे अधिकारी समजले जातात. आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली ती शाळा चालू आहे. इराकमध्ये त्या तोडीची शाळा नाही तरी तिचा विस्तार फार लहान आहे. तेथील विद्यार्थी हिंदुस्थानविषयी चौकस दिसले. त्यांच्याकडे जातांक्षणीच त्यांनी 'आमच्या शाळेतही एक हिंदी गृहस्थ आहेत, चला दाखवितों,' असे म्हणून मुख्य दिवाणखान्यांतील महात्मा गांधींच्या चित्राकडे बोट केलें ! शाळेतल्या विद्यार्थ्यांपैकी एकानें महात्माजींचे नेहमीच्या आसनस्थ स्थितींतलें चित्र पेन्सिलीने काढले होते. 'सत्कीर्तीचा डंका' सर्वत्र गाजत असल्याने महात्माजींना बसऱ्याच्या शाळेत मान मिळाला. त्यांच्या जोडीला तशीच आणखी दोन चित्रे होती. एक अमेरिकन प्रेसिडेंट वुड्रो वुइल्सन यांचे,

८९