पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/37

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

भोंदू गुरूचे लपंडाव

या गुरूंचा अनुभव आल्याने आता केवळ परप्रांतियांनाच ते आपल्या कळपांत ओढतात. सर्वात आश्चर्य करण्यासारखी गोष्ट म्हणजे या दोन बंधूबरोबर एक तरुणी होती. वडील बंधूची ती पत्नि असे भासविल्याने व ती देखील गुरुसेवेस जात असल्याने हिंदु लोकांनी अत्यंत करडी नजर ठेवून एके दिवशी त्या वडील बंधूस गाठले. त्यांच्या परिस्थितीविषयी चौकशी केली, तेव्हा XXX हून कॉलेजचा अभ्यासक्रम सोडून ते तेथे आले असे कळले. अर्थातच त्यांना या मुसलमान गुरूनेच इतक्या दूर आणले हे स्पष्ट झाले. त्यांना सहानुभूति दाखविणारे असे कोणीच न भेटल्याने ते मुसलमानी जाळ्यांत पूर्णपणे गुरफटणार, इतक्यांत एका भल्या हिंदु गृहस्थाने दोन्हीही भावांस नौकरी देऊन सर्व प्रकारे सहाय्य देण्याचे आश्वासन दिले व मुसलमानांचा संबंध सोडण्याची अट घातली.
 कांही दिवसांनी गुरूचे प्रताप उघडकीस आले व ही तीन तरुण मंडळी त्या तावडीतून सुटली. परंतु अद्याप त्या गुरूवरील त्यांची भक्ति पूर्णपणे उडालेली नाही. आईबापांनी या 'चुकलेल्या' मेंढरांची कांहीच वास्तपुस्त केली नाही, असा पेशावरप्रांतीय हिंदूचा ग्रह झालेला असून तो स्पष्टपणे बोलूनही दाखवितात. हिंदूनी मुसलमान गुरूपासून ताईत, गंडे इत्यादि घेतांना अतःपर दक्षता बाळगावी आणि त्यांना घरच्या मंडळींशी सलगी करू देऊ नये असा निरोप तिकडील हिंदूंचा आहे.

 उपर्युक्त मुलांची खरी परिस्थिति काय आहे, घरांतून ती बाहेर का पडलीं, ह्या गोष्टी निश्चितपणे कळल्या नसल्या तरी त्याचेबरोबर असलेली तरुणी ही विवाहित स्त्री असावी असे समजण्यास पुष्कळ जागा आहे."माझी सोडवणूक करा." अशा आशयाचे एक पत्र

३१