पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/36

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

चालणार नाही." अँग्लो-इंडियनी कुर्रा म्हणतात तो हा असला ! बाकी वरिष्ठ कायदेमंडळाच्या एखाद्या सभासदाने या खर्चाचा आंकडा प्रश्न विचारून मागवून पहावा.
 हिंदु-मुसलमानांची तेढ वायव्यसीमाप्रांतांत विशेष दिसून येते आणि ती चटकन् डोळ्यांत भरते. हिंदु हे संख्याबलाने अगदीच कमी असले तरी, समाजांत त्यांचे स्थान महत्त्वाचे आहे. कोणतेही गांव घ्या, तेथील प्रमुख व्यापारी हिंदूच आढळावयाचे ! (शीख हे हिंदूंत समाविष्ट धरले आहेत). हिंदूंचा व्यापारी बाणा व तज्जन्य धन ही मुसलमानांना पहावत नाहीत आणि म्हणूनच ते हिंदूंचा द्वेष करतात. शिवाय इतिहासाने शिकविलेला अनुभव अगदी कायमचा असा हिंदूंना ठाऊक आहे. त्यामुळे मुसलमानांच्या सहवासांत कोणी हिंदु राहूं लागला की, तत्काळ स्थानिक पुढारी त्याच्या हालचालीवर पाळत ठेवतात. येथे आल्यावर एक असाच प्रसंग आला की, त्यायोगें हिंदु पुढाऱ्यांचे स्तुत्य वर्तन स्पष्टपणे दृष्टीस पडले.

 xxx शहरांतील एका चांगल्या सुस्थितीतल्या कुटुंबांतील दोन सुशिक्षित भाऊ कांही मुसलमानांनी फुसलावून पळवून इकडे आणले होते. हिंदु मुलें मुसलमानांशी इतक्या सलोख्याने वागतात हे पाहतांच पेशावरच्या हिंदु पुढाऱ्यांनी तत्संबंधी चौकशी केली. तेव्हा त्यांना असे कळले की, xxx हून त्या मुलांना एका मुसलमानाने इकडे आणून बाटविण्याचा प्रयत्न चालविला आहे. मुलाच्या वडिलांची व त्या मुसलमानाची ओळख आहे, इतकेच नव्हे तर, त्यांचा आपसांत पत्रव्यवहारही चालतो असे समजले. मुसलमान बुवाजी 'धर्मगुरू 'चा आव आणून मांत्रिक व औषधी तज्ज्ञाचे सोंग घेतात. त्यांच्याकरवी ताईत, गंडे, दोरे, औषधी घेणारे पूर्वी पेशावरास बरेच हिंदु होते. परंतु त्यांना

३०